साताऱ्यात दुपारपासून पावसाची संततधार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा जिल्ह्यात गेले आठ दिवस दडी मारून बसलेल्या मान्सून पावसाने आज दुपारी एक वाजल्यापासून संततधार याला सुरुवात केली आहे या पावसामुळे नागरिकांची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना हायसे वाटत असून आता या पावसामुळे पेरणी केलेल्या आणि काही शेतातून होऊन आलेल्या रोपांना जीवदान मिळणार आहे .संततधार पावसामुळे सातारा शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून सकाळी 9 ते 5 या वेळात दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असूनही अक्षरशहा रस्त्यारस्त्यांवर संचारबंदी लागू केल्याचे चित्र पावसामुळे दिसून आले. शनिवार हा बऱ्याच दुकानांसाठी सुट्टीचा वार असल्यामुळे आधीच निम्मी बाजारपेठ बंद राहते .त्यातच आज बैल बेंदूर ह सण असल्यामुळे अनेकांनी आज साप्ताहिक सुट्टी घेतली होती .

या पावसामुळे शहरातील सखल भागात पाण्याची तळी साचली तसेच रस्त्यावर सामसूम दिसून येत होती. शहराच्या पश्चिमेला असणारा यवतेश्वर कडील सांबर वाडी चा बंड्या डोंगर गेले दोन दिवस काळ्या ढगांनी अच्छादून गेला होता. मात्र पावसाची हुलकावणी होती, ती आज पासून संपुष्टात आली .या पावसामुळे नागरिकांना अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढून मगच घराबाहेर पडावे लागत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!