दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । खटाव । उत्तर खटाव भागातील पुसेगाव, निढळ ,बुध व इतर गावात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला.शेतात पाणी साठले.रात्रभर पाऊस चालू होता.त्यामुळे कांदा ,वाटाणा ,हरभरा ,ज्वारी पिकाचे नुकसान झाले.दिवसभर ढगाळ वातावरण होते व रात्री पाऊस सुरू झाला.तो सकाळी पहाटे पर्यंत चालू होता.त्यामुळे ज्वारी पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले.तर पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पिकांना याचा फायदा झाला.काही गावात ओढ्याना पूर गेला तर अनेक गावांत बंधारे पाण्याने भरले त्यामुळे येणाऱ्या काळात पावसाचा फायदा होईल .उसतोड कामगारांचे हाल झाले .उघड्या वर शेतातील पालामध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी उघडयावर शेतामध्ये असलेल्या शेळ्या मेंढ्या यांचे थंडीने व पावसाने नुकसान झाले.