स्थैर्य, सातारा, दि. ०५ : गेलेे दोन दिवस जोराच्या् पावसाने हैराण केलेे आहे गेलेे 2 दिवस जिल्ह्याच्या विविध तालुक्यात पावसाचा उच्चांक नोंदला गेला त्यामुळेेे जनजीवन विस्कळीत झालेेेे असून प्रशासनाने सका 9 ते 7 या वेळात परवानगी दिली असली रस्ते्ते सुनेसुने दिसत आहेत.पेरण्या केल्यानंतर उगवलेली पिके पाहून आनंदित झालेला बळीराजा पावसाने ओढ दिल्याने संकटात सापडू पाहत असताना सोमवारी रात्रीपासून सातारा जिल्हय़ाच्या पश्चिम भागात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुनरागमन केले असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठय़ात 4 टीएमसी वाढ झाली आहे. पश्चिम भागातील महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा, बामणोली, तापोळा भागात सोमवारपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. जिल्हय़ात कराड, सातारा, जावली, वाई तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडत असून जवळपास महिनाभरानंतर सुरु झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
संततधार पावसामुळे भुईमूग, घेवडा, वाटाणा, सोयाबीन ही पिके जोमाने येण्यास मदत झाल्यामुळे बळीराजा समाधानी झाला आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यात यंदा पाऊस जून महिन्याच्या 1 तारखेला दाखल झाला. पावसाचा वाढता जोर पाहून यंदाही गतवर्षी सारखा मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज लावण्यात आला. मात्र जून अखेर पावसाचा जोर मंदावला. पावसाने उघडीप द्यायला सुरूवात केली. ही उघडीप शेतकऱयांची चिंता वाढवू लागली. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीपासून सातारा जिह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली. कमी-जास्त प्रमाणात पडणाऱया पावसाचा जोर वाढला. सकाळपासून पडणाऱया पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठ ठप्प झाली होती. या बाजारपेठेवर पावसाचा जोर वाढल्याने परिणाम झालेला आहे. लोकांनी घराबाहेर न पडता घरात बसणे पंसत केले आहे. दरवर्षी पावसाळयात कास, ठोसेघरच्या पर्यटनाला गती आलेली असते. मात्र कोरोनामुळे ही गती मंदावलेली आहे. जिह्यातील विविध तालुक्यांमध्ये पाऊस पडत असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला आहे. करोना ची धास्ती वाढत असताना साथीच्या आजारांनी निमंत्रण मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.