सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ जुलै २०२३ | सातारा |
सातारा जिल्ह्यात १९ ते २१ जुलै २०२३ या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्षातून करण्यात आले आहे.

या कालावधीत पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नका व मोबाईलचा वापर करू नका. पाण्यात असाल तर त्वरित पाण्याबाहेर पडा. दरड प्रवण क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका. नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका. या कालावधीमध्ये नागरिकांनी शक्यतो पर्यटन स्थळी जाण्याचे टाळावे. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून नागरिकांना करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!