जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 284.86 मि.मी. पावसाची नोंद, गेल्या 24 तासात एकूण सरासरी 15.01 मि.मी. पाऊस
स्थैर्य, सातारा, दि. 5 : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 284.86 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 15.01 मि.मी. पाऊस झाला आहे.
महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वर मध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता .या मोसमात मागील महिन्याच्या निसर्गचक्रीवादळा सह दोन दिवस झालेल्या पावसा नंतर आज पुन्हा दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली .यामुळे प्रसिद्ध वेण्णा तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ दिसून येत होती .हवामान खात्याच्या नोंदीनुसार या मोसमात आता पर्यंत 1जुन पासुन 4 जुलै पर्यंत येथे 853.4 मिमी पावासाची नोंद झाली आहे .दरम्यान या वर्षी मान्सूनचे आगमन निसर्ग चक्री वादळासह मुसळधार पावसाने झाली असली तरी जून महिन्यात पुठे तो म्हणावसं टिकला नाही .तसा संपूर्ण महिना कोरडाच गेला .जून महिन्यात 4 जून-187.4 मिमी ,16 जून – 63.0 मिमी , 18 जून ा 74.7मिमि ,19 जून- 61.0 मिमी हे चार दिवसच पावसाचे विशेष ठरले .बाकी जून महिना तसा पावसाच्या दृष्टीने बेताचाच गेला. अधिकृत नोंदी नुसार या वर्षी 1 जुन ते 31 जून 716.0 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली .व आज चार जुलै सकाळ पर्यंत तो 853.4 मिमी नोंदविला गेला. गतवर्षी हि आकडे वारी सुमारे 1300 मिमी पर्यंत गेली होती .आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरु होता .सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आज सुमारे सात आठ इंच पाऊस नोंद होण्याची श्यक्यता आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 17.80 (225.53) मि. मी., जावली- 31.95 (354.41) मि.मी. पाटण-29.91(357.73) मि.मी., कराड- 0.00 (187.54) मि.मी., कोरेगाव- 5.89 (180.56) मि.मी., खटाव-0 (176.88) मि.मी., माण- 0.71 (122.43) मि.मी., फलटण- 0 (161.89) मि.मी., खंडाळा- 1.55 (128.20) मि.मी., वाई – 7.14 (232.57) मि.मी., महाबळेश्वर-129.35 (1005.73).