दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२३ | सातारा |
कोयना धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे येथील नदी, ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. सध्या कोयना धरणात ६६ हजार क्युसेस पाण्याची आवक होत असून गेल्या ३६ तासात धरण पाणीसाठ्यात ७ टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ३४.३ टीएमसी झाला आहे.
पाटण भागातील अनेक रस्ते मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासन पाटणच्या आपत्ती ओढवणार्या डोंगर भागातील गावांशी संपर्क साधत असून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पाटणच्या नवीन बसस्थानक परिसरात ओढ्याचे पाणी तुंबल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
बुधवारी रात्री ८.०० वाजेपर्यंत नवजा येथे ३६१ मि.मी., महाबळेश्वर येथे ३०२ तर कोयना येथे २६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.