दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । पंढरपूर । महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणीकृत कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे . सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामांची स्थिती, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. तसेच कामगार महामंडळाकडून विविध योजनेंतर्गत कामगारांना सेवा सुविधा पुरविण्यात येतात. सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून सुरक्षा संच वाटप व आरोग्य तपासणी शिबीर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, आंबेडकर नगर, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीर मध्ये दोनशे कामगारांना सुरक्षा संच वाटप व आरोग्य तपासणी करण्यात आली. साहित्याचे वाटप बसपा चे जिल्हा महासचिव रवी सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहू सर्वगोड,अविनाश आवचारे, विशाल ऐदाळे, प्रशांत पवार,सुरज साखरे, स्वप्निल कांबळे, आकाश सर्वगोड, स्वप्निल सिताराम सर्वगोड, भुषण सर्वगोड, अभिजीत शिंदे, युवराज माने,अजित चव्हाण, अजय चव्हाण, शुभम ठोकळे इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे, विजय शिकतोडे, महेश कळकुंबे, विकास क्षीरसागर, किशोर कदम, लखन सवयसर्जे, सिताराम वाघमारे इत्यादी होते.