आरोग्य म्हणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


१. खाल दररोज गाजर – मुळे, तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त.

३. डाळी भाजीचे करावे सूप, अखंड राहील सुंदर रूप.

४. तरोट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त, आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५. जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटातील वाजंत्री.

६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड.

७. पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सदा सुखी.

८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका.

९. दररोज एक फळ खावू या; आरोग्याचे संवर्धन करु या.

१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ऱ्हास.

११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार; आहारात यांचे महत्व फार.

१२. हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज.

१३. जेवणा नंतर केळी खा; पचनशक्तीला वाव द्या.

१४. साखर व तूप यांचे अती सेवन करु नका, मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.

१५. खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन वेगळे.

१६. गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८. सुका मेवा ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.

१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका, जीवनसत्वांचा नाश करु नका.

२०. जो घेईल सकस आहार, दूर पळतील सारे आजार.

२१. भाजीपाल्याचं एकच महत्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्व.

२२. शेंगेत शेंग, शेवग्याची शेंग, तिचा पाला, तीच अंग, सत्व आहे तिच्या संग.

२३. कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबीवाणी.

२४. आरोग्य म्हणींचे हे उपयोगी सत्र; अंमलात आणाल तर रहाल कायमचे निरोगी मात्र.

चला निरोगी राहू, आनंदी हसतखेळत राहू

आपलाच संग्राहक ​​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!