महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.५: येत्या काही दिवसात सर्वत्र दिवाळीची धुम पाहायला मिळणार आहे. पण, यापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका आरोग्य मंत्र्यांनी मांडली आहे.

याबाबत राजेश टोपे म्हणाले की, ‘फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला साजरी करण्याची मानसिकता आतापासून ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे. फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी मोठ्या प्रमाणात असते. थंडीमुळे तो फटाक्यांचा धूर वर जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे श्वसनाचा त्रास सुरू होऊ शकतो. यामुळेच दिवाळीपूर्वी फटाके बंदीचा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील’, अशी माहिती टोपेंनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्य टास्क फोर्स आणि डेथ ऑडिट कमिटीची आज आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कोरोना मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत बैठकीत चर्चा झाली.

येणाऱ्या दिवाळी सणात नागरिकांनी जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग पालन, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे तसेच, फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्मयंत्र्यांनी यावेळी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!