दैनिक स्थैर्य | दि. १३ मार्च २०२३ | फलटण |
राजस्थानी महिला मंडळ फलटण यांच्यावतीने मॅग आणि माऊली फाउंडेशन संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर, फलटण येथे दि. ११ मार्च २०२३ रोजी अनोखा जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी महिला मंडळाने त्यांच्या मंडळातील महिलांचे हेल्थ चेकअप करून घेऊन महिलांमधील आरोग्यविषयक जागृतीचा उत्तम संदेश यानिमित्ताने दिला आहे.
जनसेवेच्या कार्याची माहिती अॅड. राहुल कर्णे यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मॅग फायनान्सचे सर्वेसर्वा श्री. अनिल मोहटकर यांनी राजस्थानी महिला मंडळाचे कौतुक केले आणि आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. राजस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरोज करवा यांच्या कार्याबद्दल जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरतर्फे जनसेवा डायग्नोस्टिकच्या सचिव सौ. सुनीता मोहटकर यांनी त्यांचा सत्कार केला. राजस्थानी महिला मंडळातर्फे श्री. अनिल मोहटकर व डॉ. अतुल दोशी यांचा सत्कार केला. महिला दिन केक कापून साजरा करण्यात आला. जनसेवेतर्फे टेस्ट केलेल्या महिलांना हेल्थ कार्ड भेट देण्यात आले.
कार्यकामाचे सूत्रसंचलन अॅड. धीरज टाळकुटे यांनी केले. सौ. मनीषा घडिया यांनी आभार प्रदर्शन केले.