
दैनिक स्थैर्य | दि. 01 एप्रिल 2025 | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरडगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
याचे उद्घाटन माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे. यावेळी युवा नेते डॉ. नितीन सावंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सदरील आरोग्य तपासणी शिबिर हे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले तर यामध्ये तब्बल 135 नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली आहे.
सदरील आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन हे तरडगाव येथील जुन्या ग्रामपंचायतीच्या चावडी येथे आयोजन करण्यात आले होते.
तर सदरील आरोग्य तपासणी शिबिरास लोणंद येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड सिटी केअर सेंटर यांचे सौजन्य होते.