
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
लायन्स क्लब फलटण, ऑन्को केअर ट्रस्ट, ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर, शेंद्रे आणि आरोग्य विभाग, सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यातील ताथवडा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य, कर्करोग, शुगर इ. तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ताथवडा गाव आणि परिसरातील एकूण ८१ लाभार्थ्यांची मिशन तेजस्विनी उपक्रमामार्फत मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण ६ संशयित रुग्णांना ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर येथे मोफत वैद्यकीय चाचणी आणि उपचार करण्यात येणार आहेत.
यावेळी ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे विभागप्रमुख डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. मनिषा मगर आणि त्याची संपूर्ण टीम, लायन्स क्लब फलटणचे ला. जगदीश कारवा, ला. रणजित बर्गे, प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडाचे मेडिकल ऑफिसर डॉ. पूनम शिंदे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.