
स्थैर्य, निंबळक, दि. 11 ऑक्टोबर : येथील श्री निमजाई देवी ग्रामविकास पॅनल आणि उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांच्या सहकार्याने, गावातील नागरिकांसाठी ‘जन आरोग्य सेवा’ कार्ड नोंदणी आणि आरोग्य तपासणी कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून, २१७ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
या कॅम्पमध्ये नागरिकांची बीपी, शुगर आणि इतर १६ प्रकारच्या तपासण्यांसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले. तसेच, लाभार्थ्यांना ‘जन आरोग्य सेवा कार्ड’चे वाटपही करण्यात आले. या कार्डद्वारे लाभार्थी दोन लाख रुपयांपर्यंतचे उपचार घेऊ शकणार आहेत.
यावेळी सरपंच सिमा बनकर, ग्रामविकास अधिकारी उद्धव सुपेकर, आरोग्य विभागाचे डॉ. मोरे, संजय कापसे, तंटामुक्ती अध्यक्ष जयराम मोरे, काशिराम मोरे, शिवाजीराव पिसाळ, नंदकुमार भोईटे, अमोल निंबाळकर, उदय भोसले, श्रीकांत निंबाळकर, हरिभाऊ भोसले, बाबुराव कवितके, पंकज निंबाळकर, विद्याधर यादव, धनंजय भोसले, रामभाऊ भोसले, काशिनाथ शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.