आरोग्य सेतू ॲप ठरले जिल्ह्यसाठी उपयुक्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 2 : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र शासनाने आरोग्य सेतू ॲप विकसीत केले आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून आरोग्य सेतू ॲप ॲपद्वारे जिल्ह्यात प्रभावीपणे काम सुरु आहे. ॲपच्या माध्यमातून आत्तापर्यंत  जिल्ह्यातील 5 रुग्ण आढळले आहेत. 5 रुग्णांना आरोग्य विभागाने वेळीच उपचार सुरु केले आहेत.

या ॲपद्वारे जिल्ह्यातील 979 नागरिकांनी संपर्क साधला साधून  असून  487 जणांना घरात विलगीकरण करण्यात आले तर 54 जणांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. 13 स्वयंसेवक या ॲपला जोडणाऱ्या नागरिकांशी वेळोवेळी संपर्क साधत आहेत.

आरोग्य सेतू ॲप कसे काम करते

जेव्हा आपण आरोग्य सेतू ॲप इंस्टॉल करतो त्या नंतर आपली माहिती टाकून आपण ॲप सेटअप करतो. त्यानंतर सेतू ॲप बॅकग्राऊंडला चालू राहते जे यूजर चे लोकेशन (GPS व्दारे मिळणारे longitude, latitude) सतत सर्वरला सेंड करते. सोबत बलुटुथ चालू असते. ज्या वेळी आपण बाहेर फिरत असतो त्या वेळी जवळच्या ब्लुटूथ (इतर आरोग्य सेतू ॲप चालू असतील त्यांची) ची माहितीही ते गोळा करून त्या यूजरच्या खात्यात जमा करते. सोबत लोकेशन डेटा ही जात असतो.

या दोन्ही गोष्टी वापरून एकदा यूजर पुण्याहून सातारा जिल्ह्यात आला तर त्याची माहिती आपल्याला घेता येते.   जेव्हा तो यूजर पॉझिटिव्ह येतो तेव्हा त्याच्या फोन नंबर वरून बॅक ट्रेकिंग करून त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सेतू ॲप यूजर ना निटीफिकेशन जाते. या आरोग्य सेतू  ॲपमधील  खूप गोष्टी आपोआप होणाऱ्या असतात.

समाजा प्रति आपल्या कर्तव्याची जाणीव झाली- सुजीत वाघमारे  ( स्वयंसेवक )

कोरोना महामारी च्या आपत्तीजनक परिस्थिती च्या काळात आपले आारोग्य कर्मचारी, स्वछता कर्मचारी वर्ग व इतर कर्मचारी विभाग त्याचे सर्वस्व पणाला लावून दिवस रात्र लढत आहेत.  अशा परिस्थितीमध्ये  आपणही समाजाचे देणे लागतो हे   लक्षात घेऊन कर्तव्य पार पाडण्याची संधी आरोग्य सेतु विभाग सातारा व आरोग्य विभाग सातारा यांच्यावतीने मिळाल्या बद्दल  जिल्हाअधिकारी   शेखर सिंह,  सहाय्यक जिल्हाधिकारी मनिष आव्हाले   इतर अधिकारी वर्ग यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.  या सर्वां सोबत काम करत असताना खुप काही शिकायला मिळाले व अनेक अनुभव आले. समाजा प्रति आपल्या कर्तव्याची जाणीव झाली, अशा भावना स्वयंसेवक  सुजीत वाघमारे यांनी व्यक्त केल्या आहेत.

अधिकाधिक लोकांनी आपली सामाजिक जवाबदारी म्हणून हे आरोग्य सेतू ॲप वापरावे त्यातून तुम्ही सुरक्षित राहाल आणि प्रशासनाला अलर्ट मिळेल.मला खात्री आहे सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिक हे आरोग्य सेतू ॲप वापरत असतील. जे वापरत नाहीत त्यांनी शक्य तेवढया लवकर गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन arogya setu हे आरोग्य सेतू ॲप वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

आरोग्य सेत ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!