बारामती मध्ये आरोग्य व पर्यावरण सप्ताह


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जुलै २०२२ । बारामती । राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्ष नेते आदरणीय अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरज बाळासाहेब चौधर मित्र परिवार च्या वतीने दिनांक 30 जुलै रोजी जिल्हा परिषद रुई येथे मा.नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबीर,विद्यार्थी आरोग्य शिबीर,वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सुरेखाताई चौधर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा. इम्तियाजजी शिकिलकर मा सरपंच मच्छिन्द्र चौधर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग चौधर मा. ग्रा.सदस्य शिवाजी कांबळे राजमुद्रा ग्रुप अध्यक्ष अमरशेठ घाडगे संजय साळुंके पोपट दराडे नवनाथ चौधर दादा दराडे प्रा. अजिनाथ चौधर ई. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा रुई, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्य शाळा चे सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. के के बुधराणी हॉस्पिटल पुणे, डॉ. घोळवे दत्तकृपा क्लिनिक, सूर्यनगरी सर्व नागरिक मित्र परिवार रुई यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होणे साठी विशेष सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!