माण तालुक्यात कोरोनाची तिघांना बाधा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


माण तालुक्यात कोरोनाने ओलांडली शंभरी 

स्थैर्य, म्हसवड दि. २९ : माण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागली असुन म्हसवड परिसरातील शिरतांव व पुळकोटी या दोन्ही गावांत प्रत्येकी १ रुग्ण रात्री उशीरा आलेल्या अहवालात कोरोना बाधित आल्याने माण तालुक्यात कोरोनाने शंभरीचा आकडा पार केला आहे त्यामुळे ग्रामीण भागात घबराट पसरली असुन प्रशासनाने कोरोनाची साखळी रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना म्हसवड येथील कोरोना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना माण तालुक्यात मात्र रुग्ण संख्या जिल्ह्याच्या तुलनेने कमी असल्याने प्रशासनासह नागरीकांतुन समाधान मानले जात असताना दोन दिवसांत ३ रुग्ण अचानक वाढल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. दोन दिवसांपुर्वी शिरतांव येथील ५४ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याने त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यानंतर त्याच्या पत्नीला व मुलांना म्हसवड येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते त्यांचेही आरोग्य विभागाने स्वाईप घेवुन ते तपासणीसाठी पाठवले होते दि. २८ रोजी रात्री उशीरा त्यांचा अहवाल हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला असुन त्यामध्ये बाधित पुरुषाच्या ४२ वर्षीय पत्नीचा अहवाल हा बाधित आला आहे तर त्यांच्या दोन्ही मुलांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले. दरम्यान पुळकोटी येथील एका ३६ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल हा दि. २८ च्या रात्री बाधित आला असुन आरोग्य विभागाने बाधित पुरुष व त्याच्या पत्नीला यापुर्वीच होम कॉरंटाईन केले आहे त्यामुळे पुढील धोका टळला असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. शिरतांव येथील बाधित पुरुष व त्याचे कुटुंब हे १५ दिवसांपुर्वी मुंबई येथुन गावी आलेले आहे तर पुळकोटी येथील बाधित पुरुष हा आपल्या पत्नी सह १२ दिवसांपुर्वी दुचाकीवरुन महाड ( रायगड ) येथुन गावी आलेले असुन ते गावी येताच त्या दोघांनाही आरोग्य विभागाने होम क्वॉरंटाईन केले होते. शिरतांव येथील बाधित पुरुषाला सातारा येथे तर पुळकोटी येथील बाधित पुरुषाला मायणी येथे आरोग्य यंत्रणेने दाखल केले आहे. म्हसवड येथील विलगीकरण कक्षात सध्या शिरतांव व पुळकोटी येथील बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना प्रशासनाने क्वॉरंटाईन केले असुन दोन्ही गावे प्रशासनाने कनंटेन्टमेंट झोन जाहीर करुन सिल केली आहेत.

दि.२८ रोजी रात्री उशीरा आलेल्या कोरोना अहवालामध्ये दहिवडी येथील एका १३ वर्षीय मुलाचा अहवाल हा बाधित आला असुन या बाधित मुलाच्या अहवालामुळे आता माण तालुक्यात १०४ एवढे कोरोना बाधित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागा कडुन सांगितले जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!