
दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । शिक्षणाची ज्योत पेटवणारे, देशातील पहिली मुलींची शाळा काढणारे फुले दांपत्य यांच्या नावाचा फलक गायब करून हे नाव कमी करू शकत नाही. फुले दांपत्य म्हणजे एक मोठा इतिहास आहे जो ना भूतो ना भविष्यतो कुणी घडवू शकत; परंतु हे निर्लज्जस्पद कृत्य करून काय साध्य करायचं आहे. ऐतिहासिक ठिकाणी अश्या गोष्टी घडत असतील याला पूर्ण पणे पुणे महानगर पालिका आणि सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. या घटनेमुळे संपूर्ण फुले प्रेमींच्या भावना दिखावलेल्या आहेत, संपूर्ण फुले प्रेमी याचा जाहीर निषेध करत आहे. पुणे महानगरपालिकाने लवकरात लवकर फलक अनावर करावा अन्यथा फुले प्रेमींकडून होणाऱ्या गोष्टीस पूर्णपणे सरकारी यंत्रणा जबाबदार असेल, असे मत अजिंक्य राजेंद्र फुले यांनी स्पष्ट केले.