हाथरस प्रकरण : राहुल आणि प्रियंका गांधी हाथरस पीडितेच्या घरी दाखल, 50 मिनीटे बंद खोलीत भेट; भेटीनंत प्रियांका गांधींना अश्रू अनावर


 

स्थैर्य, दि. ३: थरस गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात नेता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत केवळ 5 लोकांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांची बंद खोलीत पीडित कुटुंबाची भेट झाली. यानंतर राहुल गांधींनी न्याय मिळेपर्यंत पीडित कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. तसेच, यूपी सरकार या कुटुंबाला सुरक्षा देण्यास अयशस्वी असल्याचा आरोप केला. दरम्यान, पीडित कुटुंबाचा आक्रोश पाहून प्रियंका गांधी यांना अश्रू अनावर झाले.

राहुल गांधींना 35 खासदारांना बरोबर न्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवे (नोएडा बॉर्डर)वर अडवले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना जाण्याची परवानगी दिली आहे. तरीही काँग्रेस समर्थक गोंधळ घालत आहे. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुरू केला आहे.

दरम्यान आता दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येत पोलिस तैनात आहेत. रस्त्यामध्ये बॅरिकेड लावण्यात आले आहेत.तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, यावेळीही जाऊ दिले नाही तर आम्ही पुन्हा प्रयत्न करु. यावेळी प्रियंका आणि राहुल गाधींसोबत काँग्रेसचे 35 खासदारही आहेत.

यापूर्वी गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. दोघांना यूपी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी म्हटले होते की, त्यांनी कलम 188 चे उल्लंघन केले आहे.

पोलिसांनी राहुल गांधींची कॉलरही पकडली होती. धक्काबुक्कीत ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला इजा झाली होती. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. दोघांना गॅंगरेप पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावात जायचे होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!