दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । सातारा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला बेकायदेशीरपणे अडवून ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. ना. हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथे आज आगमन होणार आहे. ते दवाखान्यात होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यात किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा झाला, तर दौरात गनिमी काव्याने हल्ला होऊ शकते असे लेखी पत्र मला दिले. माझ्यावर हल्ला कोण करणार ? हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार होते. ते कोण गुंड आहेत का ? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
हसन मुश्रीफ यांच्यावर मी जे आरोप केले आहेत. त्याची चौकशी सुरू झाली आहे. १२७ कोटी त्यांच्या कंपनीत आले याचे उत्तर दिले नाही. मुश्रीफ परिवाराच्या सदस्यांच्या नावे फक्त दोन कोटी रूपये आहेत. बाकीचा पैसा घोटाळ्याचा आहे. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. या कारखान्याची कागदपत्रे उद्या ईडीकडे देणार आहे. 2020 मधे कोणतेही व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडियाला देण्यात आला. कोणताही दमडीचा अनूभव नसताना हा कारखाना त्यांना चालवायला देण्याचे कारण म्हणजे मुश्रीफ यांचे जावई याचे या कंपनीत आहेत. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा काढणार आहे.
हे सरकार ठाकरे आणि पवार चालवतात. त्यामुळे हे या घोटाळ्याला जबाबदार आहेत. मला माझ्या मुलूंडच्या घरी स्थानबद्ध करण्यात का आले ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दडपशाही सुरू आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या दडपशाहीला तितकेच जबाबदार आहेत. मला कोल्हापूरला जाण्यावर बंदी का केली ? जर माझ्यावर हल्ला होणार याची माहिती जर सरकारला असेल तर त्यांनी हल्ला करणारांवर कारवाई का केली नाही. मी आता पारनेरच्या कारखान्याला भेट देणार आहे. त्या कारखान्यातही कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे . 30 तारखेला अजित पवार यांनी घेतलेल्या जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करायला मी जाणार आहे.