हसनं मुश्रीफ यांच्यात उत्तरे देण्याची हिंमत नाही – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा साताऱ्यात घणाघात


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । सातारा । हसन मुश्रीफ यांच्यात कोणत्याही आरोपाचे उत्तर देण्याची धमकं नाही असा टोला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी साताऱ्यात लगाविला . कराडमध्ये स्थानबद्ध झाल्यानंतर पत्रकार परिषद आटोपून माघारी प्रवासात सातारा शहर भाजप कार्यकारिणीने येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात स्वागत करण्यात आले . यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेट वार अॅड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे इ यावेळी उपस्थित होते . त्यावेळी तेथे देखील माध्यमांशी संवाद साधताना साेमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप केले. तसेच मुश्रीफ यांच्यात उत्तर देण्याचे हिम्मत नसल्याचे नमूद केले.

सातारा महामार्गावर भाजपचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने जमले हाेते. साेमय्या माध्यमांशी बाेलताना म्हणाले मी कराड येथे घाेटाळ्यांबद्दल सांगितले आहे. हसन मुश्रीफमध्ये हिम्मत नाही उत्तर द्यायला असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले मनी लाॅड्रींगविषयी आता हसन मुश्रीफची चौकशी सुरू झाली आहे. मला शिवसेना नेत्यांच्या बद्दल एक शब्दही बोलायचा नाही. परंतु २७ सप्टेंबरला मी रशमी उद्धव ठाकरेंच्या १९ बंगला पाहण्यासाठी अलिबागला जाणार आहे असे स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!