
दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । वाई । येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या सरव्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आज आर्थिक गुन्हे शाखेने त्याला वाई येथे आणले होते. त्याच्याकडून याबाबत अधिकची माहिती घेण्यात येत आहे.
येथील हरेश्वर सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे सरव्यवस्थापक रमेश जाधव याला आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून या प्रकरणाची सखोल माहिती घेतली जात आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.पोलिसांकडून या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकशे वीस बोगस कर्ज प्रकरणांची गहाण खते पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. त्या गहाण खातंबाबत बाबत योग्य ती माहिती घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. बँकेच्या सरव्यवस्थापकला पोलिसांनी आज आज वाई येथे आणून बँकेमध्ये घेऊन जाऊन चौकशी करण्यात आली. या प्रकरणाची त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी बोगस कर्ज प्रकरण यांची गहाणखत ए व त्या अनुषंगाने कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सदर बोगस प्रकरणांचा सर्च व व्हॅल्यूएशन रिपोर्ट देणाऱ्या संबंधितांना आर्थिक गुन्हे शाखेने तपासकामी नोटिस बजावली असून त्यांना हजर राहण्याबाबत कळविले आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे व विक्रम कणसे, मनोज जाधव, प्रसाद जाधव, अजित पवार व टीम करत आहे.आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाच्या तपासाला वेग देण्यात आला देण्यात आला आहे.