महाराष्ट्र शिवशाही माथाडी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी हरी आटोळे


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । बारामती । महाराष्ट्र शिवशाही माथाडी आणि जनरल कामगार युनियन च्या प्रदेश उपाध्यक्षपदी बारामती चे हरी आटोळे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष संतोष चौधरी, सरचिटणीस दत्तात्रय पवार यांच्या सूचनेनुसार सदर नियुक्तीचे देण्यात आले.सदर नियुक्ती हि एक वर्षासाठी असून, बारामती तालुक्यात कामगारांच्या विविध प्रश्नासाठी हरी आटोळे यांचे योगदान महत्पूर्ण असून सामाजिक क्षेत्रात सुद्धा विविध कार्यात त्यांचा सहभाग असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन सदर निवड करण्यात आली आहे.

बारामती, कुरकुंभ, इंदापूर आदी परिसरातील एमआयडीसी मधील कामगारांचे प्रश्न शासन दरबारी मांडू व कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे निवडीनंतर हरी आटोळे यांनी सांगितले


Back to top button
Don`t copy text!