दैनिक स्थैर्य । दि. ३१ जुलै २०२३ । मुंबई । हॅप्पी पॅरेंट्स लॅब या नाविन्यपूर्ण सोल्यूशन्सच्या अग्रणी कंपनीने पुण्यातील लर्निंग व चाइल्डकेअर स्पेस सीएटीएस लर्निंग सेंटर येथे त्यांचे उल्लेखनीय इंटरनेट फिल्टरिंग उत्पादन हॅप्पीनेट्झ बॉक्स लाँच केले. इव्हेण्टला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामधून कुटुंबिय त्यांच्या मुलांसााठी सुरक्षित व अधिक संतुलित ऑनलाइन अनुभवासाठी इंटरनेट वापराचे व्यवस्थापन व देखरेख ठेवण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची हॅप्पीनेट्झ बॉक्सची व्यापक क्षमता दिसून येते.
हॅप्पीनेट्झच्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रिचा सिंग म्हणाल्या, “पुण्यातील सीएटीएस लर्निंग सेंटर येथे हॅप्पीनेट्झ बॉक्सचे लाँच आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला कुटुंबांसाठी क्रांतिकारी सोल्यूशन सादर करण्याचा अभिमान वाटतो. हे उत्पादन पालकांना इंटरनेट वापराचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करते. आमचे उत्पादन ३ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचा स्क्रिन टाइम आणि अयोग्य कन्टेन्ट पाहण्याबाबत पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान अधिकाधिक कुटुंबांसाठी उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे. हे उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही खिशाला परवडणाऱ्या किमतीत उत्पादन लाँच केले आहे आणि हे उत्पादन भारतातील शहरी भागांमध्ये, विशेषत: प्रथम व द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये लाँच करण्याचे ठरवले आहे. या शहरांमध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आहे. या भागांमधील संभाव्य बाजारपेठ आकार ८० ते १०० दशलक्ष व्यक्तींपर्यंत असण्याचा अंदाज आहे, ज्यापैकी २५.६८ टक्के व्यक्ती आमच्या लक्ष्य वयोगटामध्ये मोडतात. आम्ही अधिक पुढे जात वापरकर्त्यांचे अभिप्राय व सर्वसमावेशक तंत्रज्ञानाच्या पाठिंब्यासह सतत नाविन्यता आणण्याप्रती कटिबद्ध राहू. आमचे डिजिटल वातावरण निर्माण करण्याचे ध्येय आहे, जेथे कुटुंबं प्रगती करण्यासोबत भावी जबाबदार डिजिटल नागरिक उदयास येण्याला चालना देतील.”
४००० ते ४५०० रूपयांपर्यत किंमत असलेले हॅप्पीनेट्झ बॉक्स अनेक प्रबळ वैशिष्ट्ये वितरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले अत्याधुनिक डिवाईस आहे, ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांचा ऑनलाइन अनुभव सुरक्षित करण्यासाठी वापरण्यास सुलभ बॉक्स मिळाले आहेत. या उत्पदनाच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मोड-आधारित वर्गीकरण सिस्टम, जी विशेषत: विविध वयोगटातील व्यक्तींच्या गरजांची पूर्तता करते. तीन विशिष्ट मोड्स -किड (१३ वर्षांखालील), टीन (१३ वर्ष व त्यावरील वयोगटातील) आणि पॅरेंट (१८ वर्ष व त्यावरील वयोगटातील प्रौढ) पालकांना उत्तमप्रकारे सेटिंग्ज करण्यास आणि त्यांच्या मुलांसाठी वैयक्तिकृत ऑनलाइन वातावरण निर्माण करण्यास सक्षम करतात.
सोयीसुविधा व सुरक्षिततेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी उत्पादनामध्ये हॅप्पीनेट्झ सेंट्रल सिस्टम समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये ११० दशलक्षहून अधिक वेबसाइट्स व अॅप्सना १५ विभागांमध्ये वर्गीकृत करण्यासाठी प्रगत फिल्टरिंग क्षमता आहेत. यामुळे पालकांना हे विभाग (अडल्ट अॅण्ड सिक्युरिटी व सेफ सर्च वगळता) सहजपणे ऑन किंवा ऑफ करता येतात आणि ते त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित इंटरनेट वातावरणाची निर्मिती करू शकण्याची खात्री मिळते. या उत्पादनाचे आणखी एक सर्वोत्तम वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट शेड्यूल कार्यक्षमता, जे पालकांना त्यांच्या मुलांच्या अद्वितीय गरजा व पसंतींनुसार सानुकूल इंटरनेट अॅक्सेस लिमिट्स स्थापित करण्यास सक्षम करते.