मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १२: कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजूला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

‘तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान जग कदापिही विसरणार नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी रुग्णसेवेत अथक परिश्रम घेणाऱ्या परिचारिकांविषयी कौतुकोद्‌गार काढले आहेत.

नर्सेस-सिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिचारिका-रुग्णसेविका कोविड योद्ध्या आहेत. त्या कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत आघाडीवर राहून, रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळाले आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहे. या योगदानाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.


Back to top button
Don`t copy text!