दैनिक स्थैर्य | दि. १८ जानेवारी २०२५ | फलटण |
हॅपी थॉट्स, तेजज्ञान फाउंडेशनतर्फे ‘संपूर्ण लक्ष्य’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दोन बॅचेस मध्ये रविवार, दि. १९/०१/२५ रोजी सकाळी १० ते १ व शनिवार दि. २५/०१/२५ रोजी दुपारी ४ ते ७ ज्ञान ध्यान केंद्र, कोळकी बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, फलटण या ठिकाणी होणार आहे. या शिबिरासाठी रजिस्ट्रेशन करतेवेळी फक्त तीनशे रुपये भरावे लागणार आहेत.
हॅपी थॉट्स, तेजज्ञान फाउंडेशन अर्थात हॅपी थॉट्सतर्फे घेतले जाणारे महाआसमानी परमज्ञान शिबिर हे आत्मसाक्षात्कार शिबिर आहे. यामध्ये सहभागी साधकांना स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचा अनुभव मिळतो आणि ते प्रत्येक क्षणी वर्तमानात जगण्याची कला, भय आणि चिंतामुक्त जीवन कसे जगायचे, हे शिकतात. हे शिबिर पाच दिवसांचे आहे. ते दोन पद्धतीने घेतले जाते. निवासी शिबिर पूर्ण पाच दिवस, मनन आश्रम पुणे या ठिकाणी होते तर दुसरे शिबिर संपूर्ण लक्ष्य शिबिर म्हणून ज्ञान ध्यान केंद्रावरती घेतले जाते. शरीराच्या आणि मनाच्या सर्व विकारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि बुद्धिप्रामान्य जीवनाकडून सच्चित आनंदी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी, शाश्वत आनंदाच्या अवकाशाला गवसणी घालण्यासाठी हे शिबिर सर्वांसाठी आवश्यक आहे . तरी हीींिीं://ींशक्षसूरपसश्रेलरश्र.ेअॅस/ीश्री या लिंक वरती आपले रजिस्ट्रेशन करावे.
या शिबिराचा लाभ आत्तापर्यंत फलटणमधील १५०० हून अधिक साधकांनी घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेऊन आपले जीवन सकारात्मक आणि आनंदी करून घ्यावे, असे आवाहन तेजस्थान संयोजक यांनी केले आहे. शिबिरासाठी मोबाईल नंबर ९४२०४९६६२९/९४०५७२४९४७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.