फलटणमध्ये ‘हॅपी थॉट्स’तर्फे ‘संपूर्ण लक्ष्य’ शिबिराचे आयोजन; जीवनाला सकारात्मक दिशा देण्याची संधी


स्थैर्य, फलटण, दि. 19 नोव्हेंबर : हॅपी थॉट्स आणि तेजग्यान फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाणारे ‘महाआसमानी परमज्ञान शिबिर’ अर्थात ‘संपूर्ण लक्ष्य शिबिर’ यंदा फलटणमध्ये आयोजित करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर खुले असणार आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या साधकांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा पाच स्तरांवर विकास साधला जातो. यामध्ये एकाग्रता वाढवणे, निर्णय घेण्याची क्षमता सुधारणे, संवाद कौशल्य, आत्मविश्वास वाढवणे आणि आत्मविश्लेषण या बाबींवर मार्गदर्शन केले जाते. मानसिक शांती आणि आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरते.

कौटुंबिक आणि मानसिक स्वास्थ्य

कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये मधुरता आणणे, ध्यान आणि त्याचे फायदे समजावून घेणे, तसेच आशा आणि विश्वासासह क्षमेची जादू अनुभवण्याची संधी या शिबिरात मिळते. भय, चिंता, क्रोध, ईर्ष्या, द्वेष आणि अतिविचार यांसारख्या नकारात्मक वृत्तींपासून मुक्ती मिळवून प्रत्येक क्षणी वर्तमानात जगण्याची कला या माध्यमातून शिकवली जाते.

कोळकी येथे होणार शिबिर

हे शिबिर दोन बॅचेसमध्ये पार पडणार आहे. पहिली बॅच रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत असेल. तर दुसरी बॅच रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत होणार आहे. हे आयोजन कोळकी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शेजारील ज्ञान ध्यान केंद्रात करण्यात आले आहे.

हे शिबिर पाच दिवसांचे असून ते निवासी आणि स्थानिक अशा दोन पद्धतींत घेतले जाते. फलटणमधील स्थानिक शिबिरासाठी इच्छुकांनी https://tejgyanglobal.org/sls या लिंकवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना वचनबद्धता म्हणून केवळ तीनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

आतापर्यंत फलटणमधील १५०० हून अधिक साधकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, त्यांनी आपल्या जीवनात अमूलाग्र बदल अनुभवले आहेत. शाश्वत आनंदाच्या शोधात असलेल्या आणि जीवनाला योग्य दिशा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे शिबिर महत्त्वाचे आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपले जीवन सकारात्मक आणि आनंदी करावे, असे आवाहन तेजस्थान संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी ९४२०४९६६२९ किंवा ९४०५७२४९४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!