मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्री गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांनी आपल्या सर्वांचे जीवन उजळून निघावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरु पुरब अर्थात श्री गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यानिमित्ताने श्री गुरु नानकजी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पण केले आहेत.

श्री गुरु नानक जयंती निमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, श्री गुरू नानक यांनी सदैव मानव कल्याणाचा विचार केला. त्यांच्या या विचारांचे प्रकाश पर्व निर्माण व्हावे आणि त्यातून आपल्या सर्वांचे जीवन उजळून निघावे. देशातील आणि राज्यातील तमाम शीख बांधवांसह सर्वांना गुरु पुरबच्या शुभेच्छा आणि श्री गुरु नानकजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!’


Back to top button
Don`t copy text!