स्थैर्य, फलटण, दि. २४ : मुस्लिम समाजामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा मानला जाणारा रमजान ईद हा सण असतो. या सणानिमित्त तीस दिवस कडक उपवास केले जातात. सोमवारी रमजान ईदचे उपवास संपत आहेत. या सणाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील तसेच फलटण तालुक्यातील व शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रमजान ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना पाठविलेल्या संदेशात श्रीमंत रामराजे म्हणाले आहेत की, कोव्हिड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व लागु असलेले प्रतिबंधात्मक आदेश व लॉकडाऊनची नियमावली या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी रमजान ईद शांततेत पार पाडावी. तसेच नमाज पठन करता वेळी सोशल डिस्टन्सिंग राहील याची काळजी घ्यावी, असे हि आवाहन करुन पुढे संदेशात श्रीमंत रामराजे म्हणाले की, सातारा जिल्ह्याला एक आगळी वेगळी परंपरा असून या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये हिंदू व मुस्लिम धर्मामध्ये कायम ऐक्याची भावना राहिली असून हे दोन्ही समाज गुण्या-गोविंदाने राहत असल्याचेही शेवटी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संदेशात म्हटले आहे.