बारामतीच्या हॅपी मेडिकेअर चा बेस्ट परफॉर्मन्स सेंटर म्हणून गौरव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२३ । बारामती । १२६ देशांमध्ये जर्मेनिंअम स्टोनच्या माध्यमातून असंख्य नागरिकांना निरोगी व स्वस्थ आरोग्य देण्यासाठी काम करणाऱ्या हॅपी मेडिकेअर या साऊथ कोरियन कंपनीच्या भारतातील बेस्ट परफॉर्मन्स सेंटर म्हणून गौरव करण्यात आला.

14 वर्षापूर्वी रमेश जोशी यांनी बारामती येथे सुरू केलेल्या हॅपी मेडिकेअर सेंटरला मिळत असलेला प्रतिसाद तसेच नागरिकांना कोविड काळात दिलेल्या सेवा करिता हॅपी मेडिकेअर कंपनीचे सीओ डु.सांग.कीम. भारताचे चेअरमन इल.सांग.कींम. महाराष्ट्र रिझनल डायरेक्टर धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरिया येथे बारामती सेंटरचे संचालक रमेश जोशी यांचा सन्मान करण्यात आला.

कोरिया येथील सन्माना नंतर बारामती हॅपी मेडिकेअर या ठिकाणी फटाक्यांच्या अतिशबाजीने मोठ्या जल्लोषात ट्रॉफी चे स्वागत करण्यात आले.
यावेळी हॅपी मेडिकेअर सेंटर मधील थेरपी घेणाऱ्या नागरिकांना रमेश जोशी यांनी कोरिया येथील जीवनशैली तसेच तेथील नागरिकांचे आरोग्य संदर्भातील जागृता यासंदर्भातील माहिती दिली. तेथील लोक आरोग्याची कशा पद्धतीने काळजी घेतात याविषयी माहिती दिली. सेंटर मधील लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन रेगुलर थेरपी करावी अशी सर्वांना माहिती देऊन आपले कुटुंब निरोगी करावे तरच आपला परिसर किंवा आपले शहर निरोगी होईल याबद्दल आरोग्याची माहिती देऊन लोकांना हॅपी जर्मेनिअमचा चांगल्या प्रकारचा संदेश देऊन थेरपीचा प्रचार व प्रसार करण्यास सांगितले.

हॅपी मेडिकेअर चा उपचार बारामती सेंटर मधील लोकांनी त्रास मुक्त बारामती .सक्षम बारामती.व निरोगी बारामती. करण्याचा विचार हाती घेतला आहे . यावेळी. नैसर्गिक थेरपी घेणारा असंख्य नागरिक .व सर्व सेवाभावी स्टाफ उपस्थित होते.

यावेळी रमेश जोशी यांचा सत्कार लक्ष्मणराव मोरे मा. उपसभापती यांनी शाल श्रीफळ फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसभापती लक्ष्मणराव मोरे यांनी आव्हान केले की नैसर्गिक बाह्य उपचार थेरपी मोफत असून शरीर निरोगी राहण्यासाठी कृपया सर्वांनी थेरपीचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.


Back to top button
Don`t copy text!