
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, मुंबई, दि. २४ : सर्वत्र साजरा होणारा नाताळ सण हा प्रेम, शांती, मानवता आणि एकतेचे प्रतीक आहे. नाताळनिमित्त सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जनतेला आरोग्यदायी आणि आनंददायी शुभेच्छा दिल्या आहेत.
येशू ख्रिस्त यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवाच्या कल्याणासाठी वेचले. त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांचे पालन करून नाताळ सण साजरा करावा, असे आवाहन संदेशाद्वारे केले आहे.
