नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या परोपकार, प्रेम, दया व करुणेच्या शिकवणीचे स्मरण देतो. नाताळचा पवित्र सण जीवनातील अंध:कार, निराशा व दु:ख दूर सारो व सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी मी प्रार्थना करतो. नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२२ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!