भारताचे राष्ट्रपती, नेपाळचे पंतप्रधान व राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!


                                       

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१७: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज राजकीय मतभेद बाजूला ठेवत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी तर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत अनेक दिग्गजांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशभरात दिल्लीपासून अनेक गल्लींमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कुठे रॅली आहेत तर कुठे ७० किलोच्या लाडवाचा भोग चढवला जात आहे. काही ठिकाणी रक्तदान शिबिरांचंदेखील आयोजन करण्यात आलं आहे.

भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सेवा सप्ताहच्या स्वरूपात साजरा केला जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!