
दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नानासाहेब नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जावुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले (भैय्या), श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, श्यामराव कापसे, जगन्नाथ कापसे (भाऊसोा), वरदा आर्ट्सचे महेश सुतार (गोटू) यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.