करारी पण हळवे : श्रीमंत रघुनाथराजे


फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस.

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर अत्यंत आक्रमक व करारी आहेत परंतु त्यापेक्षा अधिक हळवे आहेत. याचा अनुभव तालुक्यातील अनेक अबाल वृद्धांनी घेतलेला आहे. तालुक्यातील कोणतीही समस्या असेल ती जर रघुनाथराजेंना कळाली; तर ते त्यांच्या स्टाईलने ती समस्या सोडवतात. तालुक्यातील असणारे अधिकारी व शासकीय कर्मचारी सुद्धा श्रीमंत रघुनाथराजे यांना दबकुनच असतात. कोणत्याही तक्रारीसाठी रघुनाथराजेंचा फोन आला; तर हातातील सर्व कामे बाजूला ठेवून त्यांची तक्रार निवारण करण्याचे काम सर्वांनाच करावे लागते.

त्यांच्या करारीपणाचा अनुभव जसा सर्वजण नेहमीच घेत असतात; तसा त्यांचा हळवेपणाचा अनुभव सुद्धा अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे. एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जो थेट महाराज साहेब म्हणजेच श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्याकडे जाऊ शकत नाही; किंवा त्यांच्यासमोर स्पष्टपणे बोलू शकत नाही. तो कार्यकर्ता हा थेट श्रीमंत रघुनाथराजे यांच्या समोर बसून आपले गाऱ्हाणे मांडतो व त्याचे निवारण सुद्धा बाबा तातडीने करतात. वेळप्रसंगी स्वतः खिशातले पैसे देवून सुद्धा समोरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अडचण दूर करण्याचे काम रघुनाथराजे करीत असतात. यासोबतच कोणताही बाका प्रसंग जर त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर आला तर त्याच्या पुढे भिंत बनून श्रीमंत रघुनाथराजे हे उभे असतात; अश्या त्यांच्या हळवे पणाचा अनुभव सुद्धा तालुक्यातील अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या दिशादर्शक दूरदृष्टीच्या नेतृत्त्वाखाली गेल्या 10 ते 12 वर्षापासून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची प्रसिद्धी राज्यात सर्वदूर पसरली असून शेतकरी हिताचा हा ‘फलटण पॅटर्न’ संपूर्ण राज्यभरात ‘रोल मॉडेल’ म्हणून प्रसिद्ध होत असून आपल्या कल्पक नेतृत्त्वाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवणारे, संकट काळात शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहणारे, इतर उद्योग व्यवसायाप्रमाणे बळीराजालाही सर्वतोपरी सोयी – सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्याने धडपडणारे या बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असंख्य शेतकर्‍यांचे आशास्थान बनले आहेत.

फलटण येथे शेतकरी केंद्रबिंदू मानून कार्य करीत असताना शेतकर्‍यांच्या विविध शेतीविषयक समस्यांची सोडवणूक करुन, शेतमालाला जास्तीत जास्त दर आणि आवक आणणार्‍या शेतकर्‍यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत फलटण तालुक्यात अलिकडच्या काळात अवतरलेल्या दुसर्‍या हरितक्रांतीमुळे उत्पादित होत असलेल्या शेतीमालासाठी सक्षम अशी पणन व्यवस्थादेऊन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक लोकाभिमुख व स्पर्धाक्षम करण्यासाठी श्रीमंत रघुनाथराजे सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहेत. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणेकरिताही ते कायम तत्पर राहिलेले आहेत.

श्रीमंत रघुनाथराजे यांना उदंड आयुष्य लाभो; हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना !

– प्रसन्न दिलीप रूद्रभटे,

संपादक, “स्थैर्य”.


Back to top button
Don`t copy text!