मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करा, यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.

‘ईद-उल-अजहा’ त्याग, समर्पणाचा संदेश देणारा आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया,’ असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!