स्थैर्य, सातारा, दि. २७ : दर वर्षी राम नवमी नंतर चैत्र पौर्णिमेला साजरा होणाऱ्या रामभक्त हनुमानाची जयंती भल्या सकाळी सूर्योदयाची वेळी साजरी केली जाते. मात्र मागील दोन वर्षे करोना च्या टाळेबंदी मुळे या दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या जयंतीला मात्र एक गालबोट लागले आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म दर वर्षी सूर्योदयाच्यावेळी केला जातो. या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरात मोठे उत्सवी वातावरण दिसून येतेे मात्र गेलेेे दोन वर्ष या उत्सवाला काहीसे निराशेेेेचे वातावरण तयार झालेले आहेेे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर या उंच डोंगरावर दरवर्षी स्वयंभ हनुमान मूर्तीचा जयंतीचा उत्सव मोठ्याया उत्साहात आणि हजारो हनुुुमान भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होतो. सातारा जिल्ह्यातील सज्जनगड श्री क्षेत्र गोंदवले, याशिवाय सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील श्री गोल मारूती मंदिर, राजवाडा परिसरातील वीर हनुमान मंदिर मंगळवार पेठेतील श्री मंगल मारुती, शनिवार पेठेतील संजीवन दंगा मारुती याशिवाय डोंगरावरील मारुती अजिंक्यतारा किल्यावरील मारूती मंदिरात धार्मिक वातावरणात सकाळी सूर्योदयाचे वेळी हनुमान जन्म करण्यात आला. उपस्थित पुजारी वर्गाने सुंठवडा वाटत.. बजरंग बली की जय.. चा जय जय कार करत या उत्सवाची सांगता केली. दरवर्षी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारे कीर्तन, प्रसाद वाटप टाळेबंदी मुळे कोठेच होऊ शकला नाही.
श्री मंगल मारुती मंदिरात “श्री हनुमान जन्मोत्सव.. सातारा येधील मंगळवार पेठेमधील श्री मंगल मारुति मंदिरात “श्री हनुमान जन्मोत्सव “प्रतिवर्षी प्रमाणे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहराच्या पश्चिम भागातील सर्वात मोठा उत्सव श्री मंगल मारुति मित्र मंडळातर्फे दरवर्षी पाच दिवस आयोजित करण्यात येतो. परंतु या वर्षी जगावर आलेल्या कोरोना च्या संकटामुळे सामाजिक भान राखून व शासनाच्या आदेशाचे पालन करत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितित “श्री हनुमान जन्मोत्सव “साजरा केला गेला. पहाटे सुशांत शेवडे गुरुजी व रमाकांत देशपांडे गुरुजी यांनी श्री ना अभिषेक केला त्यानंतर पाळणा बांधून त्याची पूजा करुन सौ. काणे यांनी पाळण्याचे गाणे म्हटले. हभप श्री. भास्कर बुवा काणे यांचे हस्ते श्री ची आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वाना सुंठवडा प्रसादाचेे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नितिन नारकर, धनंजय शिंदे, उमेश नारकर, मयुरेश नारकर, श्री ईशान नातु, श्री गुरुप्रसाद पावसकर यांची उपस्थिति होती. यानंतर मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला.