
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणार्या दत्तात्रय गाडे याच्याविरोधातील खटला जलदगतीने चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फलटणमधील बहुजन समाजाने फलटणचे दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्वारगेट एसटी बसस्थानकावर काळिमा फासणारी घटना घडली. दत्तात्रय गाडेने तरुणीला फसवून जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर बलत्कार केला. या घटनेचा फलटणमधील समस्त बहुजन समाज जाहीर निषेध करतो. अशा विकृत, समाजघातकी सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे.
यावेळी अजित मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, राहुल गुंजाळ, राहुल शिलवंत, राजू पठाण उपस्थित होते.