दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गोडोली जकात नाका परिसरातील दोन फळ झाडे आणि दोन टपऱ्या आज जप्त केलेल्या या कारवाईमुळे संबंधित विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले या अतिक्रमण कारवाई मोहिमेवर राजकीय दबाव टाकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला मात्र कारवाई सुरू राहील यामुळे वाहतुकीसाठी रस्ता पुन्हा खुला झाला आहे.
गोडोली परिसरामध्ये पालिकेने गेल्या दोन दिवसापासून अनधिकृत टपर्या आणि हातगाडी यांच्याविरोधात कारवाई गतिमान केली आहे साई बाबा मंदिर ते गोडोली जकात नाका या दरम्यान असणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या टपर्या पालिकेने 24 तासापूर्वीच काढत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला होता मात्र पथकाची पाठ फिरताच पुन्हा तेथे लगोलग टपर्या उभ्या राहिल्याने अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांच्या पथकाने पुन्हा एकदा गुरुवारी दुपारी जाऊन कारवाई केली यावेळी दोन फळांच्या गाड्या आणि एक गुऱ्हाळाचे चे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई थांबवण्यासाठी बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या मात्र कारवाईचा अंक सुरूच राहिला यामुळे संबंधित टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत काहींनी राजकीय नावे घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने माघार घेतली नाही शुक्रवारी सदर बाजार परिसरात तसेच सातारा एसटी स्टँड परिसरात कारवाई होणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले.