स्थैर्य, फलटण दि.15 : अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त समजला जाणारा, महानुभाव साहित्यात उल्लेखनीय कामगिरी अविरत करणार्या महनिय व्यक्तीस चिंतनी परिवाराच्यावतीने प्रदान करण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘चिंतनी पुरस्कार’ सातारा येथील प.पू.प.म.हेमंतराजदादाजी बिडकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी मराठी भाषा व वाड्मय विभाग प्रमुख डॉ.सतिश बडवे यांना पाथरे, जि.नाशिक येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
पाटण तालुक्यातील महिंद या गावी महंत हेमंतराजदादाजी बिडकर यांचा शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला. महात्मा गांधी विद्यालय, सणबूर, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कर्हाड, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे त्यांनी शिक्षण घेतले. श्री गुरुवर्याच्या सदैव प्रसन्नरुप वरद हस्ताने व श्री ब्रम्हविद्येच्या अखंड साधनेने, आपल्या प्रासादिक नामनेप्रमाणे त्यांच्या धर्मकार्यास सुवर्णाची झळाळी प्राप्त झाली आहे. त्यांचा इतिहासाचा दांडगा व्यासंग, हिंदी – उर्दू समज, आंग्ल भाषेतील दिग्गजांच्या देदीप्य सुवचनांचे कण्ठस्थ असणारे व रसनेवर बसलेले ज्ञानभांडार दीपवून टाकणारे आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांना प्रतिष्ठेच्या ‘चिंतनी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.