दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । फलटण । श्रीमंत नाईक निंबाळकर देवस्थाने व चॅरिटेबल ट्रस्ट, कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड यांच्या संयुक्त विद्यमानने तसेच कृषि उत्पादन बाजार समिती फलटण , पंचायत समिती फलटण, नगर परिषद फलटण, महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शुक्रवार दि ०७ रोजी सकाळी १० ते ३ वाजेर्यंत स्रीरोग निदान उपचार, शस्त्रक्रिया आणि हृदयरोग मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
स्रीरोग तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीर कोळकी येथील अनंत मंगल कार्यालय येथे आणि हृदयरोग तपासणी शिबिर फलटण येथील महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरीत हृदयरोगासंबधीची तपासणी मोफत करण्यात येथील जरूर त्याची मॅमोग्राफी (स्तनतपासणी) आणि गर्भाशयमुखीची पॅप्समेअर तपासणी मोफत करण्यात येईल. तसेच शासकीय योजनेनुसार यापुढील तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत अथवा सवलतीच्या दरात करण्यात येतील.
यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गोविंदकाका उपळेकर महाराज ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
शिबीरासाठी येताना संबंधितांनी सध्या सुरु असलेल्या औषधोपचाराची माहिती व रिपोर्ट सोबत आणावेत.