दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२२ । बारामती । नेहमीच काहीतरी नवीन व वेगळे करणारी शाळा असा नावलौकिक असणारी बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल सावळ मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून ज्ञानसागरची यशाची परंपरा अबाधित ठेवली. यामध्ये श्रेयश जयदीप मुंडे (इयत्ता 1ली,केंद्रात 1ला, जिल्ह्यात व राज्यात 17वा), वैष्णवी हनुमंत जाधव (इयत्ता 3 री,केंद्रात 1ली), वैष्णवी महेश मासाळ (इयत्ता 3री, केंद्रात 2 री), तनिष्का तानाजी शिंदे (इयत्ता 6 वी, केंद्रात 1ली), तसेच आर्यन कैलास ढोले (इयत्ता 7 वी, केंद्रात 1ला) असे घवघवीत यश संपादन करून विद्यार्थ्यांनी ज्ञानसागरच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला.सदर परीक्षेत विद्यार्थ्यांनी ज्ञानसागरला साजेसं यश संपादन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर आटोळे सर, दिपक सांगळे, रेश्मा गावडे,मानसिंग आटोळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सीईओु संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.