साताऱ्यात पकडला 27 लाख रुपयांचा गुटखा; सातारा शहर पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसी पोलीस चौकी ते होटेल फुलोरा यादरम्यान बेकायदेशीररित्या गुटका वाहतूक करणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून विमल कंपनीचा सत्तावीस लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हा गुटका कर्नाटकवरून पुण्याला पाठवण्यात येणार होता. याबाबतची पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना सातारा शहरांमध्ये बेकायदेशीर गुटका घेऊन येणारा ट्रक एमआयडीसीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला पाचारण केले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी पावणे तीनच्या दरम्यान हॉटेल फुलोराच्या परिसरात सापळा रचला व आईसर कंपनीचा एक ट्रक तेथे आढळून आला. या ट्रकमध्ये शंकर केरु केदार वय 38 व सुभाष हरिभाऊ घोर अगे वय 62 राहणार बालाजी नगर धनकवडी हे दोघे होते. या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून विमल कंपनीचा तब्बल सत्तावीस लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गुटका कर्नाटक वरून पुण्याला पाठवला जात होता. हा सर्व माल जप्त करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनाच्या हवाली करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार वाघमारे अधिक तपास करत आहेत. संतोष कचरे यांनी शहर पोलिस ठाण्यांमध्ये या प्रकरणाची फिर्याद दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!