वाई पोलिसांच्या धाडीत सुमारे साडेसहा लाखांचा गुटखा जप्त


दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२३ | सातारा |
वाई शहरातील गंगापुरी भागात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राज्यात विक्रीसाठी निघालेला ६,३७,८८४ रूपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाईचे परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी वाई शहरात पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक इसम गुटखा घेऊन वाई शहरातील गंगापुरी येथून त्याच्याजवळील कारमधून (क्र.एमएच४३आर५९८३) राज्यात विक्रीसाठी निघाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे छापा टाकला असता तो इसम गुटख्यासह कारमध्ये बसलेला दिसला. त्याच्याकडून पोलिसांनी चारचाकी गाडीसह सुमारे ६,३७,८८४ रूपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे.


Back to top button
Don`t copy text!