
स्थैर्य, फलटण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रसिद्ध श्री रुद्रभटे यांच्या ‘गुरुयात्रा’ येथे आकर्षक आणि सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गेली ५१ वर्षे आकर्षक व सुबक मूर्ती विक्रीची अखंड परंपरा रुद्रभटे परिवाराने जपली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शाडूच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. परंपरेला आधुनिकतेची जोड देत, विविध रूपांतील गणेश मूर्ती भाविकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘गुरुयात्रा’च्या वतीने देण्यात आली.
रविवार पेठ येथील डॉ. बर्वे हॉस्पिटलसमोर ‘गुरुयात्रा’चे कार्यालय असून, तेथे भाविकांना मूर्ती पाहता येतील. तसेच, मूर्तीची ऑनलाईन बुकिंग करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी 9403166788 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.