गुरुकुल स्कूल ठरली संपूर्ण लसीकरण करणारी पहिली शाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । दि. ३ जानेवारी पासून भारतात १५ ते १८ वयोगटामधील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला.   सातारा शहरातील शाहुनगर येथील गुरुकुल स्कूलच्या १५ ते १८ दरम्यान वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “पहिल्याच दिवशी १०० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण” करणारी गुरुकुल भारतातील पहिली शाळा ठरली असून शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालक यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले.

यावेळी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणिस दीपक प्रभावळकर, मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, उपमुख्याध्यापिका अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, माध्यमिक विभागप्रमुख सोनाली तांबोळी व शिक्षक उपस्थित होते.

कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले की, कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्हीही लस सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांचे आरोग्यास प्राधान्य देणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून व लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शाळेमधील १५ ते १८ वय पुर्ण केलेल्या १६५ विद्यार्थ्यांचे आज लसीकरण जिल्हा रुगणालया मार्फत १०० टक्के पुर्ण करण्यात आले.

गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यावेळी बोलताना म्हणाले, केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या लसीचा उपक्रम स्तुत्य असून या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी लसवंत व्हावे.  यासाठी  विद्यार्थ्यांच्या पालकांनी जागरूक राहुन वेळीच स्वतःच्या पाल्याला लस द्यावी असे मत व्यक् करुन, गुरुकुलच्या पालकांनी लसीकरणासाठी संमती दिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानले तसेच पहिल्याच दिवशी राबविण्यात आलेल्या १०० टक्के लसीकरणाची इतिहासात नक्कीच नोंद घेतली जाईल.

या लसीकरण मोहिमे प्रसंगी मधुकर जाधव, अँड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वाती फणसे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!