
दैनिक स्थैर्य । 18 एप्रिल 2025। फलटण । येथील गुरुकृपा संगीत विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त संवाद संगीतोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प. पू. उपळेकर महाराज देवस्थान समितीच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, गुरुवर्य हेळबे, गुरुवर्य नेरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने शुक्रवार दि. 18 रोजी हार्मोनियम, तबला, गायन यांचे वैयक्तिक सादरीकरण होणार आहे. तसेच शनिवार दि. 19 रोजी मंगेशकरांची गीते, भजनी मंडळाचे सादरीकरण हा कार्यक्रम प. पू. उपळेकर महाराज मंदिर हॉल येथे होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विलास देशपांडे, सौ. स्वाती देशपांडे, अनिकेत देशपांडे, आदिती देशपांडे यांनी केले आहे.