
दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । अहिल्यानगर गजानन चौक येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन गुरुवार (दि. 10) रोजी करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गुरुवार दि. 10 रोजी सकाळी साडेपाच वाजता श्रींचा अभिषेक होणार आहे. सकाळी साडेसात वाजता आरती होणार आहे.
सकाळी 11 वाजता पालखी निघणार आहे. दुपारी साडेबारा वाजता नैवेद्य व त्यानंतर आरती होणार आहे. दुपारी दोन वाजता श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन होणार आहे.
दुपारी चार वाजता श्री स्वामी समर्थ महिला मंडळाचे भजन होणार आहे. रात्री साडे सात वाजता आरती होणार असून त्यानंतर आठ वाजता प्रसाद वाटप होणार आहे.
त्यानंतर श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.