गुरसाळे ग्रामपंचायतीचा आरोग्य स्वच्छतेवर भर


स्थैर्य, खटाव, दि. 25 : करोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे आरोग्य व स्वच्छतेवर चांगलाच भर दिला आहे. गावामध्ये कार्यरत असणार्‍या अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागाचे गाव पातळीवरील कर्मचारी घरोघरी जावून सर्व्हेक्षण करत आहेत. तर सरपंच सौ. पंचशिला झेंडे, उपसरपंच सत्यवान कोकरे व इतर सर्व सदस्यांनीही कोरोना पासून लोकांना वाचविण्यासाठी निर्धार केला आहे.

ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील प्रत्येक घरास साबण तसेच सॅनिटायझरचे वाटप केले आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य भरत जाधव, धनंजय क्षीरसागर, डॉ. बाळासाहेब झेंडे, हेमंत जाधव, भागवत जाधव आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच वसंत जाधव, संजय जाधव, विष्णू मांडके, कोमल जाधव, मंगल जाधव, विद्याताई पाटोळे, वैशाली घाडगे, अश्‍विनी वाघ, ग्रामविकास अधिकारी सौ. खाडे, नानासाहेब जाधव उपस्थित होते


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!