औंध येथील गुरव समाजाच्या वतीने कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडे 10 बेड सुपुर्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खटाव, दि. ०५: खटाव तालुक्यातील  कोरोनाचीगंभीर स्थिती पाहता शासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  मूळपीठ यमाईदेवीचे पुजारी यांनी 10 बेड आज शासनाकडे  प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी व  प्रांत जनार्दन कासार यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण जमदाडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळीमंडलाधिकारी गजानन कुलकर्णी , औंध तलाठी निनाद जाधव, कृषीमंडलाधिकारी अक्षय सावंत आदी उपस्थित होते. कोवीडकाळामध्ये समाजोपयोगी अशी अनेक काम येथील गुरव समाजाच्या वतीने करण्यात आली आहेत.
मे 2020 च्या दरम्यान सुमारे दोन हजार पेक्षा जास्त व्यक्तींना समाजामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. गरजू लोकांना किराणामाल, शिधा  देण्यात आला होता.
त्याचप्रमाणे कोविड योद्धयांना  ड्रायफ्रूट्स ,सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज इत्यादी वस्तू देण्यामध्ये ही समाजाचा सहभाग होता. हीच परंपरा राखत आज  कोवीड बांधीतांची वाढती संख्या लक्षात घेता व व बेडचा तुटवडा लक्षात घेता ,गुरव समाजाने ही मदत शासनाला केलेली आहे .
या संपूर्ण कार्यात  रमेश गुरव,  सागर गुरव ,हनुमंत गुरव, तेजस गुरव, अमोल गुरव, संदीप गुरव ,शैलेंद्र गुरव, गणेश गुरव, सचिन पछाडे, सोहम गुरव, राजेंद्र गुरव यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे काम यशस्वी झाले आहे. कार्यक्रमास कृषी मंडलाधिकारी अक्षय सावंत, सौ साठे मॅडम, सादिगले उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!