
बारामती : अभिनेत्री पौर्णिमा डे यांचा सत्कार करताना रोहिणी खरसे आटोळे व इतर महिला.
स्थैर्य, बारामती, दि. 25 ऑगस्ट : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवात गुणवडी (ता. बारामती) येथील जय भवानी दहीहंडी संघाने 6 थर लावून सहेली फाऊंडेशनचा वहिणीसाहेब चषक पटकावला.
येथील सहेली फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी खरसे आटोळे व सहकारी महिलांच्यावतीने पार्थदादा दहीहंडी उत्सव 2025, वहिनी साहेब चषकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुणवडीच्या जय भवानी दहीहंडी संघाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
या प्रसंगी ज्युनियर पुष्पा फेम अभिनेते अजय मोहिते, सिने अभिनेत्री पूर्णिमा डे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रविंद्र माने, दुध संघाचे अध्यक्ष संजय कोकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विश्वासराव आटोळे, पिंपळी लिमटेक च्या सरपंच स्वाती ढवाण, जयहिंद सेनेचे अध्यक्ष संग्राम देवकाते, बारामती भगिनी मंडळ अध्यक्षा आरती सातव, अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, सहारा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉ.श्रद्धा जवंजाळ,एड पूजा वाघमोडे, अविनाश काळकुटे, स्वाभिमानी अल्पसंख्यांक संघटनेचे संस्थापक दिलीप चौधरी, अध्यक्ष न्यामतुल्ला शेख,कांतीलाल काळकुटे,गजानन नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षारोपण ,रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप,महिलासाठी गौरी सजावट आदींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सहेली फाउंडेशनने स्वतःच वेगळेपण सिद्ध केल्याचे मान्यवरांनी सांगितले.
अभिनेते अजय मोहिते,सिने अभिनेत्री पूर्णिमा डे यांनी मालिकेतील विविध संवाद व गीतांवर नृत्य सादर करत अभिनय क्षेत्रातील प्रवास सांगितला.व उपस्थितांचे मनोरंजन केले. दहीहंडी महोत्सवात जय भवानी संघ व जय मल्हार संघ गुणवडीच्या गोविंदा पथकाने सहभाग घेतला.उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट नृत्य या बदल विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले तर हरिभाऊ आटोळे यांनी आभार मानले.